NMRDA च्या आयुक्तपदी एम एम सूर्यवंशी यांची नियुक्ती

Share This News

आज राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांचे आदेश आज दुपारी जारी केले.

एम एम सूर्यवंशी, सहसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. या पूर्वी या पदावर शीतल तेली उगले या कार्यरत होत्या. निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका, अकोला या रिक्त पदावर करण्यात आली आहे. सोबतच राहुल रेखावार यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण जीवननोत्ती अभियान, नवी मुंबई या रिक्त पदावर पदावर करण्यात आली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.