कोटामध्ये लष्कराच्या जवानाची आत्महत्या

कोटा
राजस्थानच्या कोटामध्ये लष्कराच्या एका जवानाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या जवानाचे नाव पप्पू यादव असल्याचे सांगण्यात येत आहे. होणार्‍या पत्नीने म्हणजे वाग्दत्त वधूने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तीन दिवसांनी जवानाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पप्पू यादव हा जवान लष्कराच्या कुमाउ रेजिमेंटमध्ये होता. तो सुट्टी घेऊन आपल्या घरी आला होता. तो डेहराडूनमध्ये तैनात होता. वाग्दत्त वधूने आपल्या घरात आत्महत्या केली. हे कळल्यानंतर जवान तणावात होता. चित्ताेडगढ जिल्ह्यात एका तरुणीसोबत जवानाचा तीन वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता. चेचाट पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात देवलीकला गावात आपल्या घराजवळील शेतात हा जवान सोमवारी गेला. शेतातील झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. जवानाच्या मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेली कुठलीही चिठ्ठी आढळून आली नाही. पोस्टमॉर्टमनंतर जवानाचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला आहे. या प्रकरणी तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रेमात अपयश आल्याने लष्कराचा जवान जीवनाची लढाईच हरला. होणार्‍या पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्याला धक्का बसला. यामुळे तो तणावात होता. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर आपले स्टेटस ठेवले होते, तो भावुक झालेला होता.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.