अत्याचारांमध्ये वाढ होत असतानाही अट्रॉसिटी कायदा कमजोर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच .

Share This News

आदिवासींवरील अत्याचारांमध्ये २६ टक्क्यांनी वाढ atrocities-against-tribals-increase-by-26-per-cent-abn

दलित आदिवासींवरील अत्याचार थांबण्याची चिन्हे अद्याप नाहीत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार गेल्या वर्षभरात आदिवासींवरील अत्याचारांमध्ये २६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका विशिष्ट समाजाविरुद्धच्या गुन्ह्य़ांमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात वाढ होणे, ही चिंतेची बाब आहे. आदिवासी व दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असतानाही अ‍ॅट्रॉसिटी कायदा कमजोर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच दिसतात.

दोन वर्षांपूर्वी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याची आगपाखड काही उच्चवर्णीय समाजाकडून करण्यात आली. त्यानंतर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करून तो अधिकच कमजोर करण्यात आला. दुसरीकडे एससीआरबीच्या अहवालानुसार, दलित व आदिवासींवरील अत्याचारासंदर्भातील आकडेवारी उच्चवर्णीयाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. २०१९ मध्ये आदिवासी समाजावरील अत्याचाराचे देशभरात ८ हजार २५७ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१८ मध्ये आदिवासींवरील अत्याचाराचे गुन्हे ६ हजार ५२८ होते. एकंदर देशातील आदिवासींची लोकसंख्या विचारात घेता गुन्ह्य़ांच्या प्रमाणात २६.५ टक्क्यांनी वाढ आहे. एका मागासलेल्या समाजावरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढ होणे चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे, मारहाण आणि दुखापत होण्याच्या १ हजार ६७५ घटनांची नोंद वर्षभरात झाली असून दुसरा क्रमांक आदिवासींवरील बलात्काराचा लागतो. वर्षभरात १ हजार ११० आदिवासींवरील बलात्काराच्या घटना समोर आल्या असून एकूण गुन्ह्य़ांमध्ये बलात्काराच्या घटनांचे प्रमाण १३.४ टक्के आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.