स्टारबस चालकाकडून महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न

नागपूर : मद्यधुंद अवस्थेतील स्टारबस चालक व वाहकांनी मिळून महिला प्रवाशाच्या अपहरणाचा प्रयत्न केला.याकरिता त्यांनी  पोलिसांचे बॅरिकेटिंग तोडून पळण्याचा प्रयत्न केला.ही घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहर पोलीस मुख्यालयाजवळ घडली.कळमेश्वर ते सीताबर्डी दरम्यान धावणाऱ्या एका स्टारबसमध्ये रात्री  एकच महिला प्रवास करीतहोती.त्यावेळी बसमध्ये एक चालक व दोन वाहक होते.तिघेही मद्यधुंद होते.बसमध्ये महिला एकटीच असल्याचे  तिचे अपहरण करण्याचा चालक व वाहकांचा प्रयत्न होता. त्यांनी  पोलीस मुख्यालयाती गॅस गोदामाजवळ लावलेले बॅरिकेटही तोडले.परंतु बसचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला धडकली व थांबली.बसमध्ये केवळ एकटी महिला दिसल्याने लोकांना संशय आला.त्यांनी चालक व वाहकांना पकडून बेदम मारहाण केली.काही वेळात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस व गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी चालक व वाहकांचीलोकांच्या तावडीतून सुटका केली.बस चालकांच्या अशा कृत्यामुळे  सामाजिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.