कळमना पोलिस चौकीसमोरच हत्येचा प्रयत्न

Share This News


नागपूर : शहरात गुन्हेगारी मोठय़ाप्रमाणात निर्ढावल्याचे रोजच पाहायला मिळत आहे. लहानसहान गोष्टींवरून कोणावरही मारहाण करण्यास धावून जाणे आणि जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, या घटना शहरात रोजच घडताना दिसत आहे. गुरुवारी (ता.२८) घडलेल्या घटनेत कळमना पोलिस चौकीसमोरच एका इसमावर एका गुन्हेगाराने शस्त्राचे घाव घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी इसमाचे नाव वृत्त लिहेस्तोवर कळू शकले नाही. नॉडी असे आरोपीचे नाव असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नॉडी नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाने कळमना पोलिस चौकी समोरील पोटे रेस्टॉरेंटसमोर एका इसमाच्या मांडीवर घातक शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून पळ काढला. जखमी इसमाला अत्यंत गंभीर अवस्थेत मेयो हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.