नायलॉन मांजाची विक्री व वापर थांबवण्यासाठी जनजागृती रॅली

Share This News

नायलॉन मांजाची विक्री थांबवण्यासाठी प्रशासनातर्फे आव्हान करण्यात येत असतानाही विक्रेते याकडे दुर्लक्ष करीत आहे, पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्यामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाली असून  काहीचे जीवही गेले आहे. नायलॉन मांजा घातक असून त्याचा वापर नागरिकांनी करू नये व विक्रेत्यांनी विक्री थांबवावी.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्राहक कल्याण समिती, राणा प्रताप नगर पोलीस स्टेशन व पोलीस मित्र रस्त्यावर उतरले.   मांजा हा जीवघेणा असून त्यांचा वापर तातडीने थांबवावा अशी विनंती सर्वांना केली तुम्ही विनंतीला मानत नसाल तर आम्ही कायद्याचे ब्रम्हास्त्र  उगारू आणि तुम्हाला कोठडीत टाकू असाही दम नायलॉन मांजा विक्रेत्यांना देण्यात आला.  ही रॅली पडोळे चौकातून  माटे चौक, प्रताप नगर , त्रिमूर्ती नगर चौक व पोलीस स्टेशन मध्ये समारोप झाला . सहभागी व्यक्तींच्या हातात “नायलॉन मांजा का विरोध करो, नायलॉन मांजाने पतंग उडवली तर पाच वर्षे शिक्षा, मौत वाले नायलॉन मांजा  से  बचकर”, असे फलक होते.  ग्राहक कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आशिष अटलोए व प्रतापनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठोसरे, यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक कैलास कुथे, डॉ. वैशाली अटलोए व इतर उपस्थित होते


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.