विवादित जागेवर बाळासाहेबांच्या नावाचा वापर करूं नये – देवेंद्र फडणवीस

Share This News

नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत आहे.

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अखत्यारित असलेल्या या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे नामकरण केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास आमचा केव्हाही व कधीही विरोध नाही. मात्र शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अखत्यारित असलेल्या या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.नागपुरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे नामकरण आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे झाले आहे. मंगळवारी मुंबईत ही घोषणा झाली. याबाबतचा नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.