काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करतेय- बावनकुळे

नागपूर, 04 सप्टेंबर : उत्तर भारतीयांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिले जाऊ शकते या विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यात मतपेटीचे राजकारण असल्याचा आरोप माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

यासंदर्भात बावनकुळे म्हणाले की, उत्तर भारतीयांना ओबीसी प्रवर्गांतर्गत आरक्षणची काँग्रेसची मागणी म्हणजे मुंबई, ठाणे भागातील व्होट बँकेचे राजकारण आहे. काँग्रेसचा उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा असून त्यातूनच अशा गोष्टी पुढे येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्य सरकारचे आधीच सर्व आरक्षणाचा बठ्ठ्याबोळ केला आहे, मराठा, ओबीसी आरक्षण अडचणीत असतांना परत नव्याने उत्तर भारतीयांसाठी आरक्षणाची मागणी करणे ही फसवणूक असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. ओबीसी आरक्षण संदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सूचना करून परत तीच परिस्थिती आहे. तेव्हाच फडणवीसांचे ऐकले असते तर आतापर्यंत मार्ग निघाला असता असे बावनकुळे म्हणाले. तसेच

सरकार मधील एका गटाला ओबीसींचे पद मोठ्या धन दांडग्यांना व जमीनदारांना द्यायचे आहे. ज्यांनी हे सरकार बनवले त्यांनाच असे करायचे असल्याचा आरोप देखील बावनकुळे यांनी केला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.