65 कैद्यांना कोरोनामुक्त करणाऱ्या जेल अधीक्षकांचा कोरोनाने मृत्यू, धनंजय मुंडेंकडून श्रद्धांजली

Share This News

beed-district-jail-superintendent-sanjay-kamble-dies-due-to-corona

कोरोनामुळे बीड कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संजय कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बीड: बीड जिल्हा कारागृहातील ६५ कैद्यांना कोरोनामुक्त करणाऱ्या कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संजय कांबळे यांना करोना ची लागण झाली  त्यानंतर त्यांच्यावर बीडमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय कांबळे हे एक उत्तम साहित्यिकही होते. संजय कांबळे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. ( Beed District Jail Superintendent Sanjay Kamble dies due to corona)

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबच्या अटकेनंतर त्याला फासावर लटकवण्यापर्यंत त्याच्या सुरक्षेची जबाबदारी संजय कांबळे यांच्याकडे होती. त्याचबरोबर अभिनेता संजय दत्त कारागृहात असताना संजय कांबळे त्याच्या सेलचे प्रमुख होते. दरम्यान, संजय कांबळे यांनी जिल्ह्यातील अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला होता. त्यांच्या स्वभावामुळे जिल्ह्यात त्यांचा मोठा मित्र परिवारही होता.

धनंजय मुंडे यांच्याकडून कांबळे यांना श्रद्धांजली

सामाजिक न्याय आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संजय कांबळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक, अत्यंत तरुण आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले संजय कांबळे यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. मी कांबळे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा शब्दात मुंडे यांनी संजय कांबळे यांनी श्रद्धांजली वाहिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.