भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उस्मानीविरुद्ध कठोर कारवाई करा

भाजयुमो दक्षिण-पश्चिम नागपूरचे अध्यक्ष श्री. यश सातपुते यांनी प्रताप नगर पोलीस स्टेशन येथे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिनकर ठोसरे साहेब यांना शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या केलेल्या भ्याड वक्तव्या करिता त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी या करीता निवेदन दिले.

दि. ३० जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. “आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो”, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत. असल्या विधांनानमुळे मोठ्या प्रमाणात समाजामध्ये तेढ व अस्थिरता निर्माण करणारे आहे. अश्या प्रकारचे असंतोशजनक वक्तव्य केल्यामुळे समाजाची समाजिक स्थिती ढासाळु शकते. या विषयाला घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराने भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश महामंत्री यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात शहरातील सहाही विधानसभांमध्ये पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे भाजयुमो प्रदेश कार्यकारीणी सदस्य राहूल खंगार, दक्षिण-पश्चिम नागपुरात मंडळ अध्यक्ष यश सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत राणाप्रताप नगर पोलीस स्टेशन, दक्षिण नागपुरात मंडळ अध्यक्ष अमर धरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हुडकेश्वर पोलीस स्टेशन, पुर्व नागपुरात मंडळ अध्यक्ष सन्नी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत लकडगंज पोलीस स्टेशन, मध्य नागपुरात मंडळ अध्यक्ष बादल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिल पोलीस स्टेशन, पश्चिम नागपुरात मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिताबर्डी पोलीस स्टेशन, उत्तर नागपुरात मंडळ अध्यक्ष पंकज सोनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पॅांचपावली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.