भिवंडी : एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग

 भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास या कंपनीत आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी भिवंडीसह कल्याण, ठाणे आणि उल्हासनगर अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

या कंपनीत असलेले 30 ते 40 कामगार वेळेत बाहेर पडल्याने त्यांचा जीव बचावला. ही कंपनी दोन मजली असून आगीचे लोळ सर्वत्र पसरले असून मोठा भडका उडाला आहे. या कंपनीत कच्च्या कपड्याचा आणि पक्क्या कपड्याचा मोठ्या प्रमाणावर साठा तसेच धागा होता. आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कंपनी जळून खाक झाली आहे. कंपनीतील सामानाचे मोठे नुकसान होऊन कोट्यवधी रुपयांची मोठी वित्तहानी झाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.