अंबाझरी जैवविविधता उद्यानात मोठी आग

नागपूर

अंबाझरी जैवविविधता उद्यानाला लागलेली आग वाळलेल्या गवतामुळे वेगाने पसरली. सध्या या आगीने सुमारे ५० हेक्टर परिसर कवेत घेतल्याची माहिती उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल यांनी दिली. विद्यापीठाच्या बाजूने दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही आग लागली. गवतामध्ये कागद तसेच पाॅलिथिनचे तुकडे असतात. पेट घेतल्यावर हे तुकडे उडून इतरत्र पडतात. त्यामुळेही आग पसरली असे शूक्ल यांनी सांगितले.

सुमारे ७५० हेक्टर परिसरातील या संरक्षित जंगलाचे व्यवस्थापन संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या या जैवविविधता उद्यानामुळे शहरालगत निसर्गभ्रमणाची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे. इतर आवश्यक सुविधांसह सायकल राइड आणि ई-वाहनातून सफारीचीही सुविधा या उद्यानात आहे. छायाचित्रण आणि पक्षीनिरीक्षणासाठीही अनेक निसर्गप्रेमी या उद्यानात येतात. मात्र, या आगीच्या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमनदलाचे ५ तसेच एमआयडीसी व वाडी नगर परिषदेचा प्रत्येकी १ असे सात बंब लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.