सरकार पाडण्यात भाजप व्यस्त

Share This News

भाजपचा चहापानावर बहिष्कारविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत सोमवारपासून सुरू होत आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे दोनच दिवस भरविण्यात येणार आहे. दोनच दिवस हे अधिवेशन चालणार असून राज्य सरकारने साद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या चहापानावर भाजपने बहिष्कार घातला. केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला. अवघ्या दोन दिवसांचे अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.ओबीसी समाजात गैरसमज पसरवू
नका – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोना संकट असेल, निसर्ग वादळ असेल, अवकाळी पाऊस अशी अनेक संकट राज्यावर आली तरीही त्यातून हे सरकार मार्ग काढते आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण देत असताना किंवा कोणतेही आरक्षण देत असताना कुणाचेही हक्क मारले जाणार नाही. कुणाचेही आरक्षण काढून कुणालाही दिले जाणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न येईल तेव्हा त्यांचे हक्क कुणीही हिरावून घेणार नाही. हा काहीही कारण नसताना उगाचच विरोधकांनी मुद्दा केला आहे. ओबीसी समजात गैरसमज पसरवू नका, असा दम अजित पवार यांनी दिला.
विरोधकांचे मागचे वर्ष सरकार कधी पडेल? किंवा सरकार कधी पडणार? याचे मुहूर्त शोधण्यात गेले. त्यामुळे सरकारने काय कामे केली त्याकडे त्यांचे लक्ष गेले नाही, सरकार पाडण्यात भारतीय जनता पक्ष व्यस्त आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. राज्य सरकारविषयी जनतेमध्ये कोणतीही नाराजी नाही. मात्र विरोधी पक्षामध्येच विरोधी हा शब्द आहे त्यामुळे त्यांना त्या शब्दाला जागावे लागते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ताब्यात घेण्याविषयी आमच्या सरकारमधील कुणीही काही बोललेले नाही. देवेंद्र फडणवीस आम्हाला हे काही सुचवू पाहात आहेत का?

देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षात कोण हवे आहे आणि कोण नकोय हे सुद्धा कळत नाही. प्रवीण दरेकर यांना ताब्यात घेण्याबद्दल फडणवीसांकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी जरुर द्यावेत असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
कोरोना काळात महाराष्ट्रात प्रचंड भ्रष्टाचार झाला हा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, करोना काळात जे काही घडले त्यातून आपण मार्ग काढत आहोत मात्र विरोधकांनी या सगळ्या काळातही फक्त राजकारण केले. कोरोनाच्या काळात राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडला आहे. अजूनही केंद्राकडून राज्याचे २८ हजार कोटी येणे बाकी आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.