‘एनएचएआय’ अधिकाऱ्याला काळे फासण्याचा प्रयत्न

Share This News

प्रदीप पोहणेंना वाचवण्यासाठी आमदाराचा पोलिसांवर दबाव bjp-mla-from-nagpur-city-backing-to-corporator-pradip-pohane

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्याला काळे फासण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी भाजपचा नगरसेवक प्रदीप वसंतराव पोहाणे याला वाचवण्यासाठी शहरातील एका भाजप आमदाराकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करून आरोपीला अटक करू नये, प्रकरण कसे कमजोर करता येईल, यासाठी दबाव टाकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पारडी परिसरातील उड्डाणपुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम एनएचएआयकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक प्रदीप पोहाणे आपल्या कार्यकर्त्यांसह सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील नारंग टॉवरमधील एनएचएआयच्या प्रादेशिक कार्यालयात पोहोचले व विभागीय संचालक राजीव गुलाबचंद अग्रवाल (५८), टाटा कॅपिटल, मेडिकल चौक यांच्या कक्षात  त्यांना घेराव घातला. अग्रवाल यांच्या तोंडाला काळे फासले. यानंतर  कार्यालयात तोडफोडही केली. याप्रकरणी सोमवारी रात्री सदर पोलीस ठाण्यात प्रदीप पोहाणे व त्याच्या २५ ते ३० साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून पोहाणे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

महिला नगरसेविकेसह दोघींना अटक

याप्रकरणी सदर पोलिसांनी भाजपची नगरसेविका वैशाली वैद्य आणि भाजपची कार्यकर्ता ऋती मेंढे यांना मंगळवारी अटक केली.

राजीनामा देण्याची तयारी

या घटनेनंतर एनएचएआयचे विभागीय संचालक राजीव अग्रवाल यांची मानसिक स्थिती खालावली आहे. हा अपमान पचवणे त्यांना असह्य़ होत असून आपल्या सहकाऱ्यांकडे त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण, विभाग आणि पोलिसांकडून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांचे मनोबल उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.