“करोनाने तुमच्या कानात येऊन सांगितलंय का?,” सुधीर मुनगंटीवार सभागृहातच ठाकरे सरकारवर संतापले

/bjp-sudhir-mungantiwar-maharashtra-assembly-winter-session-democracy-sgy-

लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे असं म्हणत भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. सर्व समित्या कोमामध्ये आहेत म्हणत लोकल सुरु करता येते तिथं करोनाचा त्रास होता नाही का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. राज्याचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु असून यावेळी सभागृबात ते बोलत होते.

सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरला सभागृहातील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की, “नियमाच्या पुस्तिकेनुसार पहिल्या अधिवेशनाच्या आत हे व्हायला हवं. विधानपरिषदेची नावं येत नाहीत म्हणून समित्यांचं काम होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला यामध्ये राजकारण सुरु आहे हे कळू द्या.लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे”.लोकल सुरु करता येते तिथं करोनाचा त्रास होता नाही. पण उद्या आम्ही बैठक घेतली तर करोना व्हायरसने तुम्ही बैठक घेतली तर याद राखा असं सांगित आहे,असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. बैठका सुरु झाल्यात असा आदेश द्या अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करताना तुम्ही नोटिफिकेशन द्यायलाही तयार नाही अशी टीका केली. सर्व समित्या कोमामध्ये आहेत अशी टीका यावेळी त्यांनी केली.

याआधी कामकाजाला सुरुवात होण्याआधीच सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे असं सांगत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. ३२० नियम त्यामध्ये आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. करोना, करोनाचा बाप, करोनाचा आजोबाही विचार केला तरी सभागृहात घुसू शकणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल अभिनंदन, पण याची नियमावली ठरवणार आहात की नाही. कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे”.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी बोलण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांचा गोंधळ सुरुच होता. यावेळी ते म्हणाले की, “अनेक प्रश्न आहेत..दोन दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला परवडणारं नाही. आमदारांचे अधिकार आणि त्यांचे प्रश्न सभागृहातच मांडू शकतो. सरकार आणि विरोधकांनी एकत्र बसून एक नियमावली तयार करता येईल. इतर राज्यांप्रमाणे आठ ते दहा दिवसांचं अधिवेशन घेतलं जाऊ शकतं. पुढील अधिवेशन नियमित होईल अशी कारवाई केली पाहिजे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.