भाजपचे दयाशंकर तिवारी नागपूरचे 54 वे महापौर

नागपूर महानगर पालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप चे दयाशंकर तिवारी विजयी झाले. दयाशंकर तिवारी यांना १०७ तर कोंग्रेसचे रमेश पुणेकर यांना २७ मत प्राप्त झाली.

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उर्वरित कालावधीसाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक मंगळवारी पार पडली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही निवडणूक घेण्यात आली. महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांना प्रत्यक्ष सभागृहामध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात होती व इतर सर्व पदाधिकारी म.न.पा.सदस्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी व्हावे लागले.प्रशासनाच्या विडिओ कॉन्फरनसिंग निवडणुकीच्या निर्णयावर नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली.

विद्यमान महापौर संदीप जोशी व उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांचे पदाचा राजानामा दिल्यामुळे उर्वरित काळासाठी महापौर व उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी ही निवडणूक पार पडली. नागपूरच्या महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दयाशंकर तिवारी विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दयाशंकर तिवारी हे सुरुवाती पासूनच महापौर पदाचे मुख्य दावेदार होते यानंतर ही निवडणूकीकरिता कोंग्रेस पक्षा कडून रमेश पुणेकर यांना उमेदवारी देण्यात आली.संदीप जोशी यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय राबवण्यात येणार असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज झालेल्या निवडणुकीत पाच सदस्य अनुपस्थित राहिले. आभा पांडे,किशोर कुमेरिया,पुरोषतम हजारे,गारगी चोपडा व बंटी शेळके हे नगरसेवक निवडणूक दरम्यान अनुपस्थित राहिले. बहुजन समाज पक्षाकडून महापौर पदाकरिता नामनिर्देशन सादर केलेल्या नरेंद्र वालदे यांना १० मते मिळाली. तर नगरसेविका वैशाली नारनवरे यांनी नामनिर्देशन मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.