महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना -देवेंद्र फडणवीस

Share This News

भंडारा मधील अत्यंत वेदनादाई आणि धक्कादायक घटना,प्रगतिशील महाराष्ट्रात 10 नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नसल्याचं विधासभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची उच्च स्तरीय चौकशी व दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.  अश्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखाण्याचे ऑडिट व्हायला पाहिजे.फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी व्हावी असेही फडणवीस यावेळी म्हणाले. यावर राजकारण करायचं नाही, मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहे त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहे. सोबतच मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत देण्याची मागणी फडणवीस यांनी यावेळी केली. नागपूर विमानतळावर दाखल होताच फडणवीस थेट भंडारा येथे रवाना झाले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.