भाजप खासदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट

कोलकाता, 08 सप्टेंबर : पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर आज, बुधवारी सकाळी मोठा बॉम्बस्फोट झाला. राज्यपाल जगदीप धनकड यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.

पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा मतदारसंघातील भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर तीन बॉम्ब फेकण्यात आले. घरात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत असताना ही घटना घडली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. घरावर बॉम्ब फेकले तेव्हा खासदार आणि प्रदेश भाजपा उपाध्यक्ष अर्जुन सिंह उपस्थित नव्हते. मात्र त्यांचे कुटुंबीय त्यावेळी घरी होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यावरुन बॉम्ब फेकणाऱ्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान राज्यपाल धनकड यांनी त्यांचे ट्वीट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाला टॅग केलेय. तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या परिस्थितीवर राज्यपाल धनकड यांनी चिंता व्यक्त केलीय.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.