नागपुरातील बिबट्याला पकडण्यासाठी कॅमेरा ट्रॅप

नागपूर : नागपूर : गेल्या चार दिवसांपासून नागपूर शहरात एक बिबट फिरत आहे. सुरुवातीला तो गायत्री नगर, आयटी पार्क याठिकाणी पाहायला मिळाला होता. त्यानंतर तो आता कृषी विद्यापीठ परिसरात आणि आता महाराज बाग प्राणी संग्रहालय परिसरात असल्याचं बोललं जात आहे.
महाराज बाग प्राणी संग्रहालयाशेजारी असलेल्या तालुका कृषी अधिकारी परिसरात एका डुकराची शिकार झालीय. याठिकाणी बिबट्याचे पगमार्क सुद्धा आढळून आले आहेत. त्यामुळं तो याच ठिकाणी असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी कॅमेरा ट्रॅप आणि पिंजरे लावले आहेत, अशी माहिती सहाय्यक वन संरक्षक सुरेंद्र काळे यांनी दिली आहे.
गायत्री नगर पासून महाराज बागपर्यंतचा पल्ला लांब आहे. सोबतच त्या परिसरपासून महाराज बाग परिसरापर्यंत नाला वाहतो त्याच नाल्याची मदत घेत तो इथं पर्यंत पोहचला असावा अशी शक्यता आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.