प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम रद्द करण्याची ‘या’ भाजप खासदारची मागणी

Share This News

नवी दिल्ली,  5 जानेवारी

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत 26 जानेवारीला होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमा संदर्भात माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष आवाहन केले. ट्वीटर द्वारे डॉ सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “ नवीन कोरोनाच्या निर्मितीमुळे 26 जानेवारीला होणा-या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम रद्द करावा  तसेच युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा नियोजित दौ-या त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे ढकलावा. देशांनी लसीकरणाच्या जल्लोषात हे विसरू नये की अर्थव्यवस्था ढासळत असून चीन लडाखमध्ये कमीत कमी 4000 वर्ग किमी भागात घुसतो आहे.” विशेष म्हणजे युनायटेड किंग्डममध्येच नवीन कोरोनाचा  मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला असून आतापर्यंत भारताचे 58 नागरिक संसर्गग्रस्त झाले आहेत. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन मुख्य अतिथी आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.