अमरावती मार्गावर कारची उभ्या ट्रकला धडक ; धडकेत दोन ठार तर एक जखमी

Share This News

अमरावती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाले आहे. नागपूर ते अमरावती महामार्गावर धामना शिवराजवळ हा भीषण अपघात झाला. कार मधून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये ६२ वर्षीय डॉ बाबुराव भुरे व मुलगा २५ वर्षीय गणेश भुरे यांचा समावेश आहे तर ५० वर्षीय वंदना भुरे या गंभीर झाल्या. महामार्गाने जात असताना उभ्या असलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून कारने जाणारे कुटुंबीय हे नागपूरच्या दिघोरी परिसरातील राहणारे असल्याची माहिती आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.