नागपुरात थेट किचनमध्ये घुसून केटरर्सची निर्घृण हत्या, पोलिसांकडून दोघे संशयित ताब्यात

Share This News

नागपूरच्या हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉन येथे एका केटरर्सची निर्घृन हत्या करण्यात आली आहे.

नागपूरच्या हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉन येथे एका केटरर्सची  हत्या करण्यात आली आहे. केटरिंगच्या पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. रात्रीच्या वेळी ही घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अखिलेश मिश्रा नावाचा आचारी एका लग्न समारंभात स्वयंपाक करत होता. एका स्वयंपाक खोलीत त्याचं स्वयंपाकाचं काम सुरु होतं. त्याचवेळी आरोपींनी थेट स्वयंपाक खोलीत घुसून अखिलेशची हत्या केली तर आरोपींनी घातलेल्या हैदोसात 21 वर्षीय ओम मिश्रा गंभीर जखमी झाला आहे.

केटरिंगच्या पैशाच्या वादातून आरोपींनी केटरर्सची हत्या केली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या काही तासांत पोलिसांनी वेगाने चक्र फिरवून दोघा-संशयित आरोपींनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस याप्रकरणी अधिक सखोल चौकशी करत आहेत.

नागपूर शहरात सातत्याने हत्येसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. अगदी काही दिवसांच्या अंतराने अशा गंभीर बातम्या येत आहेत. गुन्हेगारांचं दहशतीचं प्रमाण वाढत असल्याचं एकंदर चित्र आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.