CBI श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी

0

नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्या प्रकरण देशभर गाजत असतानाच या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून योग्य रितीने तपास होत नसून त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला. दिल्ली पोलिसांकडे तांत्रिक आणि वैज्ञानिक कौशल्याची आणि उपकरणांचीही कमतरता ६ महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचे पुरावे आणि साक्षीदार शोधण्यास दिल्ली पोलीस सक्षम नाहीत, असा दावाही या याचिकेत करण्यात आलाय. त्यामुळे या याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
आणखी एक श्रद्धा प्रकरण
दरम्यान, दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने देश हादरुन गेलेला असताना उत्तर प्रदेशात आझमगड येथे अशाच प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे आढळून आले आहे. या घटनेत एकाने आपल्या पूर्वीच्या गर्लफ्रेंडचा खून करुन तिच्या शरीराचे सहा तुकडे केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील आलेले आहेत. मृत तरुणीने दुसऱ्यासोबत लग्न केल्याने आरोपीने तिचा काटा काढल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी एका युवतीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पोलिसांनी प्रिन्स यादव या युवकाला अटक केली आहे. मृत युवतीचे नाव आराधना असे होते. ती प्रिन्सची पूर्वीची प्रेमिका होती. आराधना हे एका दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह केल्याने संतापलेल्या प्रिन्सने तिचे आईवडील, बहीण, मामा, मामेभाऊ व इतर नातेवाईकांच्या मदतीने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती आहे. आराधनाच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याने ते विहिरीत टाकल्याची कबुली दिली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा