राज्यात चार दिवस अतवृष्टीची शक्यता

मुंबई
पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाने मराठवाड्याला तडाखा दिला आहे. हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्य़ात काही ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने सांगली, सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, मराठवाड्यातील काही जिलंसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ९ सप्टेंबर पयर्ंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी कोकण विभागात मुंबई-ठाण्यासह सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. विदर्भातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.