चंद्रपूर – जीएसटी भवनापुढे कर सल्लागारांची निदर्शने

Share This News

मोठा गाजावाजा करून देशभर जीएसटी लागू झाला खरा; मात्र आता यातील दिवसेंदिवस होत चाललेली गुंतागुंत सोपी समजली जाणारी जीएसटी व्यवस्था अवघड करत आहे. याविरोधात जीएसटी भवनापुढे चंद्रपुरातील कर सल्लागार (टॅक्स प्रोफेशनल्स) संघटनेने एकत्रितरित्या निदर्शने केली.

दिवसेंदिवस जीएसटी उद्योग -व्यावसायिकांसाठी अडसर होत चालला आहे. सोप्या पद्धतीने जीएसटी अंमलबजावणीसाठी चंद्रपुरातील टॅक्स व्यावसायिकांनी कळकळ व्यक्त केली असून, एक छोटेखानी मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्योग- व्यापार – व्यवसाय वृद्धीसाठी जीएसटी क्लिष्टता संपविण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.