चंद्रपूर : मनपा स्थायी समिती सभापतीपदी रवी आसवानी

Share This News

चंद्रपूर 5 फेब्रुवारी : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समिती सभापतीपदासह झोन सभापती व महिला व बालकल्याण समिती सभापती पदाच्या निवडणूकीत भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले असून स्थायी समिती सभापतीपदी रवी आसवानी हे निवडून आले आहेत. महिला व बालकल्यावण समिती सभापतीपदी चंद्रकला सोयाम तर उपसभापतीपदी पुष्पा उराडे यांची निवड झाली आहे. झोन क्रमांक १ च्या सभापतीपदी अॅड. राहूल घोटेकर, झोन क्रमांक २ च्या सभापतीपदी संगीता खांडेकर तर झोन क्रमांक ३ च्या सभापतीपदी अंकुश सावसाकडे यांची निवड झाली आहे.चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्यासह सर्व नवनियुक्त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, महानगर सरचिटणीस राजेंद्र गांधी अभिनंदन केले आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.