चंद्रपूर : विद्यार्थ्यांसाठी मोफत ग्रंथालय अभ्यासिका सुरू करा

चंद्रपूर
विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय-अभ्यासिका सुरू करा, अशा मागणीचे निवेदन युवासेनाप्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य रूपेश दादा कदम, युवासेना जिल्हा विस्तारक त्रिपाठी, जिल्हाप्रमुख संदीप गिर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. नीलेश बेलखेडे, शहरप्रमुख अक्षय अंबीरवार यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर येथे चांगली रवींद्रनाथ टागोर मराठी प्राथमिक शाळा असून, काही वर्षांपासून पटसंख्या नसल्यामुळे ही शाळा बंद असून विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहेत. एक वेळ अशी होती की या शाळेत परिसरातील सर्व प्रभागाचे विद्यार्थी शिकण्यासाठी धडपड करायचे. परंतु कॉन्व्हेंट संस्कृती विचारसरणीमुळे आज अत्यंत वाईट परिस्थिती मराठी शाळेवर ओढावली असल्याने ही शाळा बंद झाल्यातच आहे. त्यामुळे आयुक्तांना विनंती करण्यात आली की एक तर ही शाळा पूर्वरत सुरू करून विषेश लक्ष देऊन विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करून पुन्हा ही शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी अन्यथा या शाळेत थोर विचारवंत,लेखक, कवी रविंद्रनाथ टागोर यांच्या नावाने येथे सुंदर ग्रंथालय, वाचनालय व मोफत अभ्यासिका सुरू करण्यात यावी जेणेकरून प्रभागातील कित्येक विद्यार्थ्यांना घडविणार्‍या एकेकाळच्या शिक्षणाच्या या माहेर घरात येथील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता व्यासपीठ मिळेल. निवेदनावर येत्या काही महिन्यातच निर्णय घेऊ, असे यावेळी महानगर उपायुक्त वाघ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.नीलेश बेलखेडे यांनी उपायुक्त यांच्याशी महानगरपालिका मराठी शाळेच्या तसेच महानगरपालिका अंतर्गत इतर शाळेच्या विकासासाठी, दैनंदिन अभ्यासक्रम बरोबरच विद्यार्थ्यांनाच्या व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास कसा करण्यात येईल जेणेकरून पालकांचा विश्‍वास संपादन करून महानगरपालिका शाळेबद्दल पुन्हा एकदा आपुलकी निर्माण होईल व ते आपल्या पाल्यांना महागड्या कॉन्व्हेंटमध्ये नाही तर महानगरपालिका शाळेत शिकविण्यासाठी प्राधान्य देईल, यावरसुद्धा चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.