चंद्रपूर : संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे माध्यमातून देशातील पहिले सफारी पर्यटन

येत्या २६ जानेवारीपासून होणार सुरुवात

चंद्रपूर 23 जानेवारी – चंद्रपूर वनवृत्तातील मध्य चांदा वनविभागात बल्लारशाह येथे संयुक्त वनव्यवस्थापन संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे माध्यमातून प्रादेशिक वनक्षेत्रातील पर्यटकांसाठी .देशातील पहिले सफारी सफारी पर्यटन येत्या २६ जानेवारीपासून सुरू होत आहे. या भागातील निसर्गदर्शन पर्यटकांसाठी वन व वन्यजीवांविषयी प्रेम निर्माण करण्यास तसेच वनाचे लोक सहभागातून व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

चंद्रपूर वनवृत्तातील मध्य चांदा वनविभागांतर्गत बल्लारशहा वनपरिक्षेत्रात संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे माध्यमातून संपूर्ण आदिवासी वस्तीचे असलेले कारवा गाव. या गावालगत असलेल्या मध्य चांदा वनविभागाच्या ग्रामीणांच्या सक्रिय लोकसहभागातून वन-वन्यजीव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्थापित होऊन वनांचे शाश्वत जतन करून लोकांचे वनवरील अवलंबित्व कमी करून त्या माध्यमातून ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करणे, त्या दृष्टिकोनातून संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या ठरावाद्वारे कारवा येथे जुने बैलगाडी रस्ते व कूप रस्ते यांचा वापर करून ३० किलोमीटरचे पर्यटनासाठी कच्चे रस्ते उपलब्ध आहे. या क्षेत्रात वाघ, बिबट,रानगवे, अस्वल रानमांजर,हरीण, चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा,सायाळ, ,रानकुत्रे ,मुंगुस, रानडुक्कर हे प्राणी व विविध प्रकारची झाडे, दोनशे प्रकारचे पक्षी व विविधरंगी फुलपाखरे यांचा देखील समावेश आहे. 
यासाठी स्थानिक गाईडला प्रशिक्षण देण्याचे काम काम सुरू आहे. भविष्यात स्थानिक लोकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने पर्यटन आणि वन व वन्यजीव व्यवस्थापन या बाबत संयुक्त वन्यव्यवस्थापन समिती कारवा यांचा निर्णय व्यवस्थापनाचे दृष्टीने घेण्यात येईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष विनोद सिडाम यांनी दिली. पर्यटन संबंधी अधिक माहितीसाठी बल्लारशाह वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मध्य चांदा वनविभागाचे उप वनसंरक्षक अ.द.मुंडे यांनी केले आहे. सदर क्षेत्रातील ३० किलोमीटरचे कच्चे रस्ते उपलब्ध असून सदर पर्यटन संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारवा यांचेमार्फत व्यवस्थापन करण्यात येणार आहे सदर वनपर्यटन २६ जानेवारी २०२१ पासून सुरू होत असून सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर खाजगी वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच भविष्यात नोंदणीकृत वाहनांना प्रवेश देण्यात येईल. भविष्यात सदर पर्यटन ऑनलाईन बुकिंग साठी संकेतस्थळ-www.mytadoba.org उपलब्ध आहे. यासाठी प्रतिदिन सकाळी ६ ते १० वाजता पर्यंतच्या वेळेत ४ व दुपारी २ ते ४ या वेळेत ४ वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.

पर्यटन प्रवेशद्वार कारवा रोपवाटिका- 
नागपूर ते कारवा— १७० किलोमीटरचंद्रपूर ते कारवा —–१९ किलोमीटर बल्लारपूर ते कारवा— ६ किलोमीटर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.