चंद्रपूर : शहरात विना हेल्मेट वाहनचालकांची संख्या वाढली

मागील वर्षी शहरात हेल्मेटसक्तीची कारवाई जोमात सुरू होती. मात्र, आता विनाहेल्मेट वाहनचालकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.
कोरोना काळात अनेक जण घरीच होते. शासनाने शिथिलता देताच प्रत्येक जण घराबाहेर पडले असून विना हेल्मेट प्रवास करीत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन वाहनधारकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. थंडावलेल्या कारवाईचा फायदा घेत दुचाकीचालक जिवाची पर्वा न करता हेल्मेटविना वाहन चाल्वाण्यिास प्राधान्य देत असल्याचे चित्र सर्वच रस्त्यांवर नजरेस पडत आहे. रस्ते अपघातात मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलिीस अधिक्षकांनी हेल्मेट सक्तीला प्राधान्य देत शहरात धडक कारवाईस प्रारंभ केला होता. मात्र कोरोना संकटकाळानंतर ही मोहीम थंडावली आहे. औद्योगिक जिल्हा असल्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकजण वाहन परवाना नसतानाही वाहन चालवित आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त मोहीम राबवून कारवाई करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.