चंद्रपूरात गेल्या 24 तासात 226 नवीन बाधित पुढे आले आहेत

१६ हजार ९१0 रुग्णांची कोरोनावर मात; उपचार घेत असलेले बाधित १,७८0

जिल्ह्यात मागील २४ तासात २८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १९९ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापयर्ंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ९७७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापयर्ंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ९१0 झाली आहे.
सध्या एक हजार ७८0 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापयर्ंत एक लाख ४३ हजार ५४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख १९ हजार ४८६ नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी येथील २९ वर्षीय पुरूष व माता मंदिर वार्ड वरोरा येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापयर्ंत २६७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६७, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले .जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 25 नोव्हेम्बर रोजी १९२०३ झाली आहे. गेल्या २४ तासात २२६ नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत १७१२१ बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये १७९५ बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत १७१२२१ बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील २६७ सह एकूण २८७ कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे , सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.