महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ ठरले दोषमुक्त

मुंबई : महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळ्यात सत्र न्यायालयाने तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना दोषमुक्त ठरविले आहे. भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले.
या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असे सत्र न्यायालयाने निर्णय देताना सांगितले. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या निर्णयाला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, असे सांगितले. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर छगऩ भूजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला . या वेळी ते म्हणाले *सत्य परेशान हो सकता लेकिन पराजित नही*

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.