मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

नागपूर:  उद्धव ठाकरे पूर्व विदर्भात आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा विदर्भातील दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात गोसेखुर्द धरण प्रकल्पापासून ते सिंचन प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. त्या शिवाय विविध समस्या जाणून घेणार आहेत. या निमित्ताने पूर्व विदर्भातील समस्यांचा घेतलेला हा आढावा.

बदलत्या धोरणांचा गोसेखुर्दला फटका

गोसेखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी 2 हजार कोरी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचं पाटंबधारे विभाकडून सांगण्यात आलं होतं. जुलैमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी प्रकल्पाच्या पुनर्वसनाला गती देण्याची सूचना केदार यांनी दिली होती. गोसेखुर्द प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता 18 हजार 494 कोटी रुपयांची आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता 1146 दलघमी आहे. तर सिंचन क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर आहे. गोसेखुर्द धरणावर खासगीकरणांतर्गत 2 विद्यूत प्रकल्प उभारण्यात आले आहेत. राज्य सरकारने मागील काही काळात सिंचन प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेत वारंवार बदल केले. ई-टेंडरसाठी नवनवीन सूचना देण्यात आल्या. त्यामुळे रद्द केलेल्या निविदा नव्याने तयार करण्यात प्रचंड अडचणी आल्या होत्या. सरकारी धोरणातील सातत्याने बदलामुळे हा प्रकल्प रखडला होता. सरकारने 27 मे 2016 रोजी गोसेखुर्दसह विदर्भातील इतर सिंचन प्रकल्पांच्या तांत्रितक व प्रत्यक्ष कामांचे अंकेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गोसेखुर्दच्या 40 निविदांचे तांत्रिक अंकेक्षण करण्यात येत होते. सोबतच राज्य सरकारने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील तब्बल 199 निविदांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.