कोरोना उत्पत्तीसंदर्भातील तपासासाठी चीनने दिला नकार

बीजिंग
दीड वर्षांपूर्वी चीनमधून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत कोट्यवधी लोकांना संसर्ग झाला आहे आणि कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण कोरोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली याचे या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत जगाला सापडलेले नाही. आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या दुसर्‍या टप्प्यातील तपासणीची जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) योजना चीनने गुरुवारी फेटाळून लावली. ज्यामुळे चीनच्या प्रयोगशाळेत तपासणी करता येणार नाही, असे एका उच्च आरोग्य अधिकार्‍याने सांगितले. डब्ल्यूएचओने या महिन्यात वुहान शहरातील प्रयोगशाळा आणि बाजारपेठेच्या माहितीसह चीनमधील कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचा अभ्यासाच्या दुसरा टप्प्याचा प्रस्ताव दिला होता.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे (एनएचसी) उपमंत्री झेंग येक्सिन म्हणाले, आम्ही अशी उत्पत्ती शोधणारी योजना स्वीकारणार नाही कारण ती काही बाबींमध्ये विज्ञानाकडे दुर्लक्ष करते. झेंग म्हणाले की, त्यांनी प्रथम आरोग्य संघटनेची योजना वाचली तेव्हा ते चकित झाले कारण या प्रयोगशाळेतील प्रोटोकॉलच्या उल्लंघनामुळे संशोधनादरम्यान विषाणूची पसरला गेल्याचे म्हटले आहे. आम्हाला आशा आहे की जागतिक आरोग्य संघटना चीनच्या तज्ज्ञांची मते व सूचनांचा गांभीर्याने आढावा घेईल आणि कोविड -१९ विषाणूच्या उत्पत्तीचा शोध घेणे ही वैज्ञानिक बाब मानली जाईल आणि राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त होईल, असे झेंग म्हणाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.