पटोलेंचे आरोप काँग्रेसच्या टूलकिटचा भाग, आमदार मुनगंटीवार यांची डागली तोप

Share This News

चंद्रपूरः पंतप्रधान मोदी यांच्या दबावामुळे महाराष्ट्राला लसी उपलब्ध झाल्या नसल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप हा काँग्रेसच्या टूलकिटचा भाग असून जगाच्या पातळीवर भारताला बदनाम कसे करता येईल, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु असल्याची तोप माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पटोलेंवर डागली आहे.
पटोले यांच्या आरोपांचा समाचार घेताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, पटोले हे काँग्रेसच्या टूलकिटचा भाग म्हणून काम करीत आहेत. पंजाब राज्याला लसी उपलब्ध होऊ शकतात, हैद्राबादच्या रेड्डी लॅबला लसी मिळू शकतात तर महाराष्ट्राला त्या का उपलब्ध होणार नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांचे अनेक देशांशी व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांच्या प्रमुख इटलीच्या आहेत. या संबंधातून त्यांना पंतप्रधान मोदी यांचा कथित दबाव काढून टाकला असता. पण, काँग्रेसला केवळ आरोप करून सरकारला बदनामच करायचे आहे. महाराष्ट्र सरकारने लसींच्या खरेदीसाठी चार सचिवांनी समिती नेमली होती. त्या चार सचिवांमध्येच एकवाक्यता नव्हती. खरेदीचे निकष स्पष्ट नव्हते. त्यामुळे अशा टेंडरला प्रतिसाद कसा मिळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
देशातील न्यायव्यवस्था व इतर व्यवस्था उध्वस्त करून देशाला जगाच्या पातळीवर बदनाम कसे करता येईल, असे काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. ही काँग्रेसची जुनी कार्यपद्धती आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.