औरंगाबादचा विकास वेगाने होणार; मला विकास कामे करण्याची घाई: उद्धव ठाकरे

औरंगाबाद: निवडणुका आल्या म्हणून मी विकास कामे करायला आलो नाही. कोविडमुळे ही कामे रखडली होती. आता थोडा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मला ही विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली असं करायचं नाही. काम पूर्ण करायचं आहे, असं मुख्यमंत्री  यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला. इतके दिवस मला या शहराने खूप काही दिलं. आता मला काम करण्याची घाई लागली आहे. या शहराचा मला वेगाने विकास करायचा आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली म्हणजे झालं असं नाही. मी काम पूर्ण करणारच आहे, असंही ते म्हणाले. औरंगाबादमधील ही पाणी पुरवठा योजना आतापर्यंत रखडली होती. कुणामुळे रखडली होती हे माहीत नाही. पण माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

रिमोट कंट्रोलमुळे ज्यांची ओळख त्यांच्या नावाच्या उद्यानाचं रिमोटनेच उद्घघाटन

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. रिमोटद्वारे हे उद्घाटन करण्यात आले. त्यावर त्यांनी मार्मिक भाष्य केलं. ज्यांच्या हातात सत्तेचं रिमोट कंट्रोल होतं. ज्यांची ओळख रिमोट कंट्रोलमुळे होत होती. त्यांच्या नावाने असलेल्या उद्यानाचे रिमोटद्वारे उद्घाटन करावं लागतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मला तुमचे आशीर्वाद हवेत

लोक मला आमचे लाडके मुख्यमंत्री म्हणतात. पण मला लाड वगैरे नको आहे. मला केवळ तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असंही ते म्हणाले. कोरोना काळात मी घरात बसून काम केली, असंही त्यांनी सांगितलं. तसेच पाणी पुरवठा योजना आता मार्गी लागली आहे. आता शहरातील गुंठेवारीचा प्रश्नही सोडवण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. (Cm Uddhav Thackeray addressing in Aurangabad programme)

बाळासाहेबांचं ज्वलंत स्मारक उभारणार

येत्या 2025 पर्यंत औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यात येईल. प्रखर राष्ट्रवादाचं आणि ज्वलंत हिंदुत्वाचं प्रतिक असलेलं हे स्मारक असेल. या स्मारकात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असं भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले

>> समृद्धी महामार्ग 1 मे पासून सुरू करणार

>> रस्त्यात खड्डडे आहेत मान्य आहे. पण हे सगळे गुळगुळीत करायचे आहेत

>> कोरोनाचा धोका टळलेला नाही. गाफिल राहू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.