26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आदरांजली

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला (26/11 Mumbai terror attack) केला होता. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली. (CM Uddhav Thackeray pays homage to martyrs of 26/11 Mumbai terror attack)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने याबाबत ट्विट केले आहे. त्यामध्ये महटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.