अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला प्रारंभ

Commencement of construction of Ram temple in Ayodhya

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. राम जन्मभूमी परिसरात पायाभरणीचे काम सुरु झाले असून पुढची एक हजार वर्ष मंदिर सुरक्षित रहावे यासाठी एलएनटी आणि टाटा कन्स्ट्रक्शनचे सर्व इंजिनिअर्स कार्यरत आहेत. या मंदिराच्या बांधकामाचं काम देशातील नऊ इंजिनिअरिंग इंस्टीट्यूटचे टॉप इंजिनिअर्स करत आहेत, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी दिली.  अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिरामध्ये 1200 खांब उभारण्याची योजना आहे. काही दिवसांपूर्वी या खांबांवर वजन टाकण्यात आलं त्यावेळी त्याच्या पायाशी असलेली जमीन काही इंच दबली गेली. त्यावेळी ती माती वाळूममिश्रित असल्याचं निष्पन्न झाले. या अडचणींवर मात करण्यासाठी मंदिराचे निर्माण हार्ड स्टोननं केलं जाणार आहे. यासाठी पायाच्या आतमध्ये जुन्या पद्धतीनुसार जवळपास 50 फुट खोल खड्डे खोदले जातील. पाया भरणीसाठी मिर्झापूरचे खास दगड वापरण्यात येत आहेत. या दगडांवर मंदिराची निर्मिती केली जाणार आहे. अयोध्या भवन निर्माण समितीचे संचालक नृपेंद्र मिश्रा यांच्यासमोर पायाभरणीचा आराखडा सादर करण्यात आला, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या विषयावर आज (गुरुवारी) अयोध्येतील सर्किट हाऊसमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर निर्माणाच्या कामातील प्रमुख इंजिनिअर्स आणि ट्रस्टचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या मंदिराच्या निर्मितीसाठी आम्ही यापूर्वीच 4 पर्यायांचा विचार केला होता. आता या चार पर्यायांमधील सर्वोत्तम पर्यायावर काम सुरु आहे  असे राय यांनी स्पष्ट केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.