मेट्रो विस्तारासाठी अभिनंदन पण, बजेट निराशाजनक : कृपाल तुमाने | Congratulations on Metro expansion, but the budget is disappointing. Kripal Tumane

Share This News

केंद्र सरकारने आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला, त्यावर रामटेक येथून शिवसेनेचे वरिष्ठ खासदार कृपाल तुमाने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, रामटेक मतदार संघात नागपूर मेट्रो फेज २ ला मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा होणार आहे. मेट्रो रेल्वेच्या फेज २ चे काम सुरु व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता, त्यास यश आले आहे, त्यासाठी सरकारचे अभिनंदन. मात्र संपूर्ण बजेटचा अभ्यास केल्यास हे बजेट निराशाजनक आहे. शेती, शेतकरी व उद्योगांच्या वाढीसाठी कोणतीही व्यवस्था यात करण्यात आली नाही. आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोर ठेऊन अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सर्व सामान्य जनतेला निराश करणारा हे बजेट असून त्यांना सवलतीसाठी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. सरकारी कंपन्यांना विकण्याचा तगदा या सरकारने लावला आहे, यामुळे जनता गरीब होईल, देशातील काही निवडक लोक श्रीमंत होतील, अशी प्रतिक्रिया रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.