विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा

Share This News

आशीष देशमुख यांची सरकारकडे मागणी

विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालेय. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात येऊन मदत करावी. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय, मुख्यमंत्र्यांनी विदर्भातही यावं: आशिष देशमुख. Congress Leader Ashish Deshmukh demands CM Uddhav Thackeray should visit Vidarbha

नागपूर : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच विदर्भातील सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. विदर्भातील शेतकरीही मदतीची वाट बघतोय. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करावं आणि मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशीष देशमुख यांनी केलीय.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळं शेतीचं अतोनात नुकसान झालं. मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले, शेतकऱ्यांचं सांत्वन केलं, मदतीचं आश्वासन दिलं. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, पूर्व विदर्भात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन पीक नष्ट झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळं या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यामुळं त्यांनाही मदतीची गरज आहे.

विदर्भातील शेतकरी मायबाप सरकार येईल आणि मदत करेल, अशी अपेक्षा घेऊन ते वाट बघताहेत. त्यामुळं ज्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांचं सांत्वन करून मदतचं आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे विदर्भातही येऊन शेतकऱ्यांना मदत करावी. जेणेकरून विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण होणार नाही, असं आशिष देशमुख म्हणाले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पोहोचले. त्याप्रमाणेच त्यांनी विदर्भातही यावे. विदर्भातील सोयाबीन पिकांला पुराचा फटका आणि यलो मोझॅकचा फटका बसल्यानं शेतकऱ्यांच्या हातून पीक गेलं आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी विदर्भात यावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.