दिल्लीच्या शेतकरी आंदोलन समर्थनार्थ काँग्रेसची नगर ते नाशिक रॅली

Share This News

अहमदनगर, 6 जानेवारी केंद्र सरकारने कोणतीही पुर्वकल्पना न देता व शेतकर्‍यांशी विना चर्चा करता संमत केलेल्या नवीन कृषी विधेयकाविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. नव्याने तयार केलेला शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करावा अशी या शेतकर्‍यांची मागणी असून केंद्र सरकार मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे.या आंदोलक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आता काँग्रेस पक्ष अहमदनगर ते नाशिक अशी रॅली काढणार असल्याची माहिती काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे यांनी दिली.८ व ९ जानेवारी या काळात ही रॅली होणार असून शुक्रवारी ८ जानेवारी सकाळी ११ वाजता अहमदनगर येथे या रॅलीचा शुभारंभ नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते होणार आहे.या रॅलीचे प्रस्थान सकाळी ११ ला होणार आहे.त्यानंतर १ वाजता राहुरी येथे आगमन,३ वाजता कोल्हार येथे या रॅलीचे आगमन होणार असून दुपारी ४.३० वाजता लोणी येथे ही रॅली येणार आहे.त्यानंतर दुपारी ५.१५ वाजता निमगाव जाळी येथे व संध्याकाळी ६.३० वाजता संगमनेर येथे या रॅलीचे आगमन होणार असून मुक्काम असणार आहे.तसेच शनिवारी ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संगमनेर येथून नाशिककडे ही रॅली प्रस्थान करणार आहे.रस्त्यात दुपारी १२ वाजता सिन्नर येथे आगमन आणि दुपारी ४ वाजता नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,विलासराव औताडे, प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,आ.लहू कानडे,बाळासाहेब साळुंखे,डॉ. तुषार शेवाळे आदि मान्यवरां च्या उपस्थित या रॅलीचा समारोप होणार आहे.या वेळी प्रत्येक ठिकाणी फ्रंटल अध्यक्ष व कार्यकर्ते या शेतकती बवाच रॅलीचे स्वागत करणार असून रॅलीत १ टॅक्टर,२ चार चाकी वाहन व ५० ते ६० मोटरसायकल सहभागी होणार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.