काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घातपाताचा कट

नवी दिल्ली
जम्मू-काश्मिरात दोनशेवर अतिरेकी घातपात घडवून आणण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली आहे. आयएसआयचे मनसुबे पाहता भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यामुळे सर्वाधिक आनंद पाकिस्तानला झाला आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानात लवकरात लवकर तालिबानचे सरकार यावे यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने प्रयत्न सुरू केले आहेत. तालिबानचेसरकार लवकर स्थापन व्हावे यासाठी आयएसआयचे प्रमुख अफगाणिस्तानात तळ ठोकून आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्याने आयएसआएची ताकद वाढली आहे. याचे परिणाम लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतात. तशी तयारी आयएसआयने सुरू केली आहे.
भारतीय सुरक्षा दलाने सीमा ग्रीड आणखी मजबूत केले आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवला आहे. सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी सीमावर्ती गावांमध्ये आर्शय घेतात. त्यांना सहजासहजी आर्शय मिळू नये यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्यात आयएसआयचा मोलाचा वाटा आहे. आयएसआयच्या मदतीमुळेच तालिबानला अफगाणिस्तान काबीज करता आला. त्यानंतर आता आयएसआयने लष्कर-ए-तोएबा, जेईएम आणि अल-बद्रच्या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २ महिन्यांपासून दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जात आहेत. सध्याच्या घडीला जम्मू-काश्मीरात जवळपास २00 दहशतवादी सक्रीय आहेत.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.