संगमनेर शेतकी संघाची सातत्यपूर्ण वाटचाल कौतुकास्पद – बाळासाहेब थोरात

शिर्डी,दि.13 : राज्यातील अनेक शेतकी संघ अडचणीत असताना संगमनेरचा शेतकी संघ मात्र दिमाखात उभा आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर येथील सहकार असून संगमनेर तालुक्याच्या सर्व संस्थांची मातृसंस्था असलेल्या शेतकी संघाची सातत्यपुर्ण वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

संगमनेर खुर्द येथे शेतकी संघाच्या नवीन पेट्रोल पंपाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी शशीकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम बाजीराव पा. खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ, गणपतराव सांगळे, अमित पंडित, उपाध्यक्ष संपतराव डोंगरे, साहेबराव गडाख, सौ. मीराताई शेटे, सौ सुनंदाताई जोर्वेकर, शांताबाई खैरे ,मिलींद कानवडे, लहानभाऊ गुंजाळ, अजय फटांगरे, सुभाष पा. गुंजाळ, साहेबराव गडाख, रामहरी कातोरे, सौ रोहिणीताई गुंजाळ, सरपंच सौ वैशालीताई सुपेकर, उपसरपंच गणेश शिंदे, कैलास पानसरे, रमेश सुपेकर, अनिल थोरात यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. थोरात म्हणाले की, सहकारातून संगमनेर तालुक्यात मोठी समृद्धी आली आहे. येथील सहकारातील प्रत्येक संस्था राज्यात अग्रगण्य आहे. या सर्व संस्थांची मातृसंस्था ही शेतकी संघ आहे. शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचे काम सातत्याने सुरू आहे. अत्यंत काटकसरीने वापर, पारदर्शकता यामुळे हा शेतकी संघ राज्यात अव्वल ठरला आहे. राज्‍यातील इतर सर्व शेतकी संघ मोडकळीस आले असताना आपला शेतकी संघ मात्र दिमाखात उभा आहे. याचे श्रेय सहकार महर्षी दादांनी घालून दिलेला आदर्श तत्वांना आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये नवनवीन होणार्‍या बदलांना सामोरे जात शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी शेतकी संघ कटिबद्ध राहील असेही ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार राज्‍यातील इतर सहकारासाठी दिशादर्शक आहे. येथील साखर कारखाना ,दूध संघ ,शेतकी संघ, अमृतहिनी बँक, शिक्षण संस्था या सर्व संस्थांचे कार्य पहिल्या क्रमांकाने सुरू आहे. शेतकी संघाने कायम जन-सामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे. येथील पेट्रोल पंप अद्ययावत असून नवीन योजना राबवून शेतकरी व ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात असेही ते म्हणाले.

शिवाजीराव थोरात म्हणाले कि, शेतकी संघाला चांगल्या नेतृत्वाची मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेत काम करण्याची मोठी संधी मिळाली. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम मार्गदर्शन केले आहे इतरांचे संघ अडचणीत असताना आपला संघ मात्र उत्कृष्ट म्हणून काम करत आह. या संघाला अनेक पारितोषिके मिळाली आहे. हीच वाटचाल आपण पुढे कायम ठेवू  असे म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.