नागपुरात कोरोना उद्रेक, तब्बल ६० जणांचा मृत्यू

नागपूर : कोरोनामुळे जिल्ह्यातील मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात गुरुवार, १ एप्रिल रोजी तब्बल ६० मृत्यूंची नोंद करण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील हे एकाच दिवसातील सर्वाधिक मृत्यू आहेत. नव्याने ३ हजार ६३० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मृत्यूचे वाढते प्रमाण आरोग्य यंत्रणेपुढे नवे आव्हान निर्माण करत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा दररोज सरासरी ४०हून अधिकच आहे. गुरुवारी शहरात ३५, ग्रामीणमधील २१ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील चार रुग्णांच्या मृत्यूमुळे हा आकडा ६० झाला. गुरुवारी शहरात २ हजार ४८१, ग्रामीणमध्ये १ हजार १४५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. एकूण करोनाबाधितांचा जिल्ह्यातील आकडा २ लाख २९ हजार ६६८पर्यंत गेला आहे. गुरुवारी दिवसभरात १७ हजार ८७८ चाचण्या करण्यात आल्या. दिवसभरात २ हजार ९२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा १ लाख ८४ हजार ५३७ झाला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.