मेडिकल व डेंटलच्या १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नागपूर
मेडिकल व डेंटलच्या १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये भरती केले असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील दोन वर्षापासून मेडिकलच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी २५0 तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) बीडीएस अभ्यासक्रमाला ५३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. २ फेब्रुवारीपासून दोन्ही महाविद्यालयाचे वर्ग सुरू झाले. मागील आठवड्यापासून सर्दी, खोकला व ताप असलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. शनिवारी तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमधून मेडिकलच्या एमबीबीएसचे १0, एका निवासी डॉक्टरसह ११ तर बीडीएसचे ४ असे एकूण १५ विद्यार्थ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले विद्यार्थी, शिक्षकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. लागण कुठून झाली याचाही शोध घेतला जाईल, असे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.