मनपा मुख्यालयातच करोना नियमांना हरताळ

करोना चा संसर्ग होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने चेहऱ्यावर मास्क न वापरणाऱ्या सामान्य नागपूर करांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो, परंतु महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकी दरम्यान काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयात हि निवडनुक पार पडली. करोना चा संसर्ग होऊ नये व गर्दी टाळावी याकरिता हि निवडणूक पहिल्यांदाच ऑनलाईन घेण्यात आली. परंतु ऑनलाईन निवडणूक असूनही मनपा मुख्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यात  नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अनेकजण चेहऱ्यावर विना मास्क दिसले, काहींचे होते तर ते देखील केवळ शोभेकरिता. अशात महापालिकेच्या मुख्यालयातच मास्क न वापरण्यानावर एकही कारवाई झाली नाही. आतापर्यंत महापालिकेच्या वतीने शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून १ कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे,  अशात खुद्द महापालिकेच्या मुख्यालयातच कॅरोना च्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्यात आले नसल्याचं चित्र होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.