दिवसभरात ३६0 जण कोरोनामुक्त; ३२२ नवे बाधित

 नागपूर
जिल्ह्य़ातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या वाढत असल्याने प्रशासनही काही प्रमाणात समाधान व्यक्त करत आहे, तर आज शनिवारला दिवसभरात जिल्ह्य़ात नव्याने ३२२ बाधितांची तर ३६0 कोरोनामुक्तांची नोंद करण्यात आली असून, आता पुन्हा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
यापूर्वीच वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असल्याचे समजून गाफिल राहून चालणार नसल्याचे जाणकारांचे म्हणने आहे. शनिवारला दिवसभरात जिल्ह्य़ात ३२९0 चाचण्या करण्यात आल्यात. यामधून शहरातील २७0, ग्रामीणचे ४९ व इतर जिल्ह्य़ातील ३ अशा नव्या ३२२ बाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये खासगी प्रयोगशाळेतून १६१ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. मेडिकलच्या विषाणू प्रयोगशाळेतून ३३, मेयोतून ४0, एम्समधून १४, माफसूतुन १४, रॅपिड अँन्टिजेन तपासणीव्दारे २६ व नागपूर विद्यापीठाच्या विषाणू प्रयोगशाळेतून ३४ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यासोबतच जिल्ह्य़ातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २१ हजार ९८८ वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात शहर व ग्रामीणमधिल अनुक्रमे १ व २ जणांचा मृत्यू झाला. तर इतर जिल्ह्य़ातील ३ अशा दिवसभरात ६ कोरोनामृतांची नोंद करण्यात आली.
यासोबतच जिल्ह्य़ातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३८९0 वर पोहचली आहे. आज दिवसभरात ३६0 जणांना सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख १४ हजार ६५ इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५१ टक्क्यांवर पोहचले आहेत. सध्यस्थितीत शहरातील ३0२८ व ग्रामीणचे १00५ असे ४0३३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १२९७ जणांनाच सौम्य व मध्यम लक्षणे असल्याने ते शासकीय तसेच खासगी रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. तर लक्षणे नसलेले २७३६ जण हे गृह विलगीकरणात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.