देशात २४,0१0 नवे कोरोनाबाधित, ३५५ मृत्यू

नागपुरात ४३0 बाधित,नऊ बळी
गुरुवारी जिल्ह्यात ४६३९ चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी शहरातील ३४७, ग्रामीणमधील ७९ व इतर जिल्ह्यातील चार अशा नव्या ४३0 बाधितांची नोंद करण्यात आली. यापैकी रॅपिड अँन्टिजेन तपासणीद्वारे ४३ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. खासगी लॅबमधून १४८, मेयोतून ८३, एम्समधून १७, मेडिकलच्या विषाणू प्रयोगशाळेतून ६२, माफसूमधून १२, निरीतून ३४ व नागपूर विद्यापीठाच्या विषाणू प्रयोगशाळेतून ३१ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. गुरुवार१ शहर व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी ४ तसेच नागपूर ग्रामीणमधील १ अशा ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.नवे कोरोनाबाधित
नागपूर – ४३0 भंडारा – ६0 चंद्रपूर – ६४
गडचिरोली – ५५
यवतमाळ – ३३
गोंदिया – ४५
अमरावती – ५९
वाशीम – ९
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या २४ तासात भारतात २४,0१0 नवे कोरोना रुग्ण आढळले असून ३५५ नागरिकांचा मृत्य झाला आहे. ३३,२९१ नवे नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे ९९,५६,५५८ रुग्ण झाले असून एकूण सक्रिय रुग्ण संख्या ३,२२,३६६ झाली आहे. एकूण ९४,८९,७४0 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा १,४४,४५१ पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण ११,५८,९६0 नमुन्यांची तपासणी केली. आतापयर्ंत देशात एकूण १५,७८,0५, २४0 चाचण्या घेण्यात आल्या आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या अधिक असल्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.