भारतात कोरोना लसीकरणाने पार केला 68.75 कोटींचा टप्पा

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर

जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 25,23,089 मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण मात्रांची संख्या 68.75 कोटी (68,75,41,762) वर पोहोचली आहे. एकूण 71,77,219सत्रांच्या माध्यमातून या लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 43,903 रुग्ण बरे झाल्यामुळे, महामारीच्या प्रारंभीपासून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,21,81,995 वर गेली आहे. परिणामी, भाराताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.44 % झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 71 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 38,948 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,04,874 असून ती एकूण बाधित रुग्णांच्या 1.23 % आहे. चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरू असून गेल्या 24 तासात 14,10,649 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताने आतापर्यंत 53.14 कोटीहून अधिक (53,14, 68, 867) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.58 % असून गेले 73 दिवस 3 % पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.76 % असून गेले 91 दिवस 5 % पेक्षा कमी आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.