कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पूर्वतयारी व उपाययोजना प्रशिक्षण वर्ग

रामटेक
आगामी काळात येऊ घातलेली कोविड-१९ ची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी याबद्दलची जनजागृती, पूर्वतयारी व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रामटेक नगर व तालुका शाखा यांच्या वतीने नुकतेच स्थानिक किराड समाज भवन, गांधी चौक, रामटेक येथे प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात एकूण चार सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. कोविडचे लक्षण, स्वरूप व त्यापासून बचाव करण्यासाठी प्रथम सत्रामध्ये रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश उजगरे यांनी मार्गदर्शन केले.
दुसर्‍या सत्रात आहार व नैसर्गिकरित्या रोग प्रतिरोधक क्षमता कशी वाढवता येईल, यासंबंधी डॉ. बापू सेलोकर यांचे मार्गदर्शन झाले. तिसर्‍या सत्रामध्ये सूक्ष्म व्यायाम, योगासन, प्राणायाम व निद्रा याबाबत प्रसिद्ध योग प्रशिक्षक राजकुमार गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
या काळामध्ये वैद्यकीय उपकरणे कशी हाताळावी याबाबतचे प्रशिक्षण रामटेकचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप बोरकर यांनी केले. प्रशिक्षण वर्गाला रा.स्व. संघाचे नगर संघचालक अँड. किशोर नवरे, जिल्हा सेवाप्रमुख उमेश गयगये, जिल्हा सहकार्यवाह विनोद मुदलियार, तालुका कार्यवाह विशाल भुते, तालुका सहकार्यवाह भूषण नानोटे, भगवान येलुरे, नगर कार्यवाह मुकेश भेंडारकर, ओम डडोरे, अभय ठाणेकर यांचेसह रामटेक नगर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.