CoronaVirus in Nagpur : ३६५ नवीन पॉझिटिव्ह, ७ जणांचा मृत्यू

नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ३६५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले व ७ जणांचा मृत्यू झाला. तर २६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,२०,९९३ झाली आहे. यापैकी १,१२,९७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण मृत्यूसंख्या ३,८७१ वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील २७६, ग्रामीणमधील ८५, जिल्ह्याबाहेरचे ४ जण आहेत. तर मृतांमध्ये शहरातील १, ग्रामीणमधील २ व जिल्ह्याबाहेरचा १ जण आहे. बुधवारी एकूण ४,५८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ३,७८१ आणि ग्रामीणमधील ८०३ नमुन्यांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत १३३, ॲन्टिजेन टेस्टमध्ये ३१, एम्सच्या प्रयोगशाळेत २५, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ३८, मेयोमध्ये ७०, माफसूमध्ये १२, नीरीमध्ये २६ आणि नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ३० नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या ४,१५१ रुग्ण सक्रिय आहेत. यात शहरातील ३,३०२ आणि ग्रामीणमधील ८४९ रुग्णांचा समावेश आहे. ॲक्टिव्ह – ४,१५१ एकूण बरे झालेले- १,१२,९७१ एकूण मृत्यू – ३,८७१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.